अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या पराभवाचा बदला घेणार – मिकी आर्थर 

अबू धाबी: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील विजयी संघ शुक्रवारी भारताविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी होणाऱ्या बांगला देशविरुद्ध अखेरच्या सुपर फोर सामन्याच्या पूर्वसंध्येलाच पाकिस्तान संघ बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि तेथेही भारताला नमवून आशिया चषक जिंकेल असा विश्‍वास पाक प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी व्यक्‍त केला आहे.
भारताविरुद्ध सुपर फोर सामन्यात 9 गडी राखून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी संघाची वाटचाल खडतर असल्याचे म्हटले होते. आता अंतिम सामन्याआधीच मिकी ऑर्थर यांनी भारतीय संघावर टीका केली आहे. पाकिस्तान निर्णायक सुपर फोर सामन्यात बांगलादेशला पराभवाची धूळ चारेल आणि अंतिम फेरीत भारताचा बदला घेईल, असेही मिकी ऑर्थर म्हणाले आहेत.
भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सुपर फोर सामन्यात आम्हाला सलामी जोडी लवकर फोडता आली असती आणि काही बळी लवकर मिळाले असते, तर परिस्थिती बदलली असती. परंतु त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केल्याचे आम्ही मान्य केले आहे. परंतु आता पुढच्या सामन्यांत पाकिस्तान संघ चांगले प्रदर्शन करेल, असे ऑर्थर यांनी म्हटले आहे. मिकी आर्थर यांची 2016मध्ये पाकिस्तानच्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पाकिस्तान संघाने इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
दरम्यान, आशिया चषख स्पर्धेत झालेल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तीनही आघाड्यांवर भारताने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले असून भारतीय संघ पाकपेक्षा वरचढ असल्याचे पाक कर्णधार सर्फराज अहमद याने मान्य केले आहे. त्यांची कामगिरी चांगली आहे, आम्ही त्या दर्जापाशी पोचू शकलेलो नाही. परंतु अंतिम सामन्यापर्यंत आम्हीही त्याच दर्जाची कामगिरी करू. पुढील सामना आमच्यासाठी “जिंकू किंवा मरू’ असा असून आम्ही या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करू, असे सर्फराजने म्हटले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)