अंतिम फेरीसाठी पाकिस्तान-बांगलादेश झुंजणार

अबू धाबी: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चार दिवसाच्या अंतरात दोनदा पराभूत झालेल्या पाकिस्तानसमोर अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी उद्या (बुधवार) बांगला देशचे आव्हान आहे. या दोन संघामधील विजयी संघ भारतीय संघासोबत अंतिम फेरीत झुंजणार आहे. भारतीय संघाने सुपर फोर गटातील आपले दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान याआधीच पक्‍के केले आहे.

आशिया चषकात बांगलादेशच्या संघाने आतापर्यंत त्यांच्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना अंतिम फेरीत पोहोचण्याची आपली आशा कायम ठेवली आहे. तर पाकिस्तानचा संघ सुपर फोर लढतीत अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. पाकिस्तानने सुपर फोरमध्ये आपल्या दोन लढतींमध्ये एक विजय मिळवला आहे, तर त्यांना एका पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांचा विजय झाला असला, तरी तो विजय अखेरच्या षटकांत झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यातच साखळी सामन्यांमध्ये श्रीलंकेसारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत सुपर फोरमध्ये धडक मारणाऱ्या बांगलादेशच्या संघानेही सुपर फोरमधील लढतींमध्ये एका सामन्यात विजय मिळवला आहे, तर त्यांना एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे बांगलादेशचा संघ बेभरवशी संघ म्हणून गणला जातो. परिणामी त्यांच्या कामगिरीचे पाकिस्तानच्या संघासमोर निश्‍चितच दडपण असणार आहे. त्यातच भारताविरुद्ध चार दिवसांच्या अंतरात दोनदा पराभवाचा सामना करावा लागल्याने पाकिस्तानचा संघ सध्या दडपणाखाली असल्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न बांगलादेशचा संघ या सामन्यात करताना दिसेल.

यूएईचे मैदान पाकिस्तानसाठी घरच्या मैदानाप्रमाणे आहे. पण तरीही त्यांच्याकडून चुका झाल्या. त्यांची फलंदाजी या मालिकेत खूप कमजोर वाटत आहे. शोएब मलिकचा अपवाद वगळला, तर त्यांचे फलंदाज अपयशी ठरले आहेत. काही प्रमाणात बाबर आझम चांगला फलंदाज आहे. पण तोही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करू शकलेला नाही.

फखर झमान आणि इमाम उल हक एकाच वेळी अपयशी ठरले तर संपूर्ण संघ कोलमडून जातो आणि तेच आतापर्यंत आशिया चषकात पाहण्यास मिळाले आहे. गोलंदाजीमध्येही पाकिस्तान अपयशी ठरला असून हॉंगकॉंग विरुद्धचा सामना वगळता त्यांच्या गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. मोहम्मद आमिरनेही निराशा केली आहे. स्पर्धेपूर्वी ज्या प्रकारे त्याच्या भेदक माऱ्याचे चित्र रंगविण्यात आले होते, त्याप्रमाणे त्याला कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानला बसलेला हासुद्धा मोठा धक्‍का आहे.

पाकिस्तान- सर्फराझ अहमद (कर्णधार व यष्टीरक्षक), फखर झमान, शान मसूद, बाबर आझम, हॅरिस सोहैल, इमाम उल हक, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाझ, फहीम अशरफ, हसन अली, मोहम्मद आमिर, शोएब मलिक, जुनैद खान, उस्मान खान व शाहीन आफ्रिदी.

बांगलादेश- मशर्रफ मोर्तझा (कर्णधार), तमिम इक्‍बाल, लिट्टन कुमार दास, मुश्‍फिकुर रहीम (यष्टीरक्षक), मदमुदुल्लाह रियाध, मोमिनुल हक, आरिफुल हक, मोहम्मद मिथुन, मुस्तफिझुर रेहमान, रुबेल हुसेन, मेहिदी हसन मिराझ, मोस्साडेक हुसेन, नझमुल इस्लाम, नझमुल हुसेन शांतो व अबू हिदर रॉनी.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)