‘अंग्रेजी मीडियम’ची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – बॉलिवूड अभिनेता इरफान खान लवकरच त्याच्या आगामी ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून तो पडद्यापासून दूर होता. मात्र, कॅन्सरवर उपचार घेऊन तो भारतात परतला आहे. सध्या तो अंग्रेजी मीडियमच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अलिकडेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट ‘हिंदी मीडियम’चा सिक्वेल आहे. या चित्रपटात करिना कपूर खानदेखील झळकणार आहे. दोघेही एकत्र या चित्रपटात दिसणार असल्यामळे चाहत्यांनाही या चित्रपटाची उत्सुकता आहे. पुढील वर्षी २० मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. होमी अदजानिया हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि राधिका मदन या दोघींच्याही चित्रपटात भूमिका आहेत. करिना कपूर या चित्रपटात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर, राधिका मदन ही इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसेल. इरफान खान चंपक नावाचे पात्र साकारणार आहे. त्यानेही त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here