अंगारकी चतुर्थीचा योग साधत भाविकांची मंदीरात गर्दी

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी)
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर मंगळवारी सातारा शहरातील विविध गणपती मंदीरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. परिसरातील गणपती मंदिरात जाऊन भाविकांनी गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. शहरात 10 पेक्षा अधिक गणपतीची मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये अंगारकी चतुर्थीचा योग साधत भाविकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. शहरातील ढोल्या गणपती, खिंडीतील गणपती, गारेचा गणपती,पंचमुखी गणपती,अिंजंक्‍य गणेश मंदीर, नटराज मंदीर, कुबेर विनायक मंदीर, ढोल्या गणपती, फुटका तलाव गणपती, दक्षीणमुखी गणपती, विश्‍वविनायक गणपती या ठिकाणी भाविकांनी हजेरी लावली. िंखंडीतील गणपती मंदिरांत दिवसभर भाविकांनी दर्शन घेतले. येथे संध्याकाळच्या वेळी गणपतीची आरती होत असल्याने परिसरातील अनेकजणांनी आरतीसाठी गर्दी केली होती. शहर परिसरातील खिंडीत असलेल्या गणपती मंदीरात तर यात्रेचेच स्वरूप आले होते. हे गणपती मंदीर पिकनिक स्पॉट झाला असल्याने चतुर्थीच्या दिवशी येथे भाविक मोठ्या उत्साहाने दर्शनाला येतात, तसेच दर्शन झाल्यावर येथील निसर्गरम्य परिसरात काही काळ विश्रांती घेतात.
अंगारकीच्या मुहर्तावर गणेश मंदिरांत भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रीघ लागली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)