अंगणवाड्यांना एलईडी टीव्हीचे वाटप

वाघोली- वाघोलीतील तेरा अंगणवाड्यांना महिला बालकल्याणच्या 10 टक्के निधीमधून वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायतच्या वतीने एलईडी टीव्हीचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून छोट्या मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून, अंगणवाड्यांच्या गुणवत्तेत वाढ करून गुणवत्ता मानांकन (आयएसओ) मिळवून देण्याचे प्रयत्न करत असल्याचे उपसरपंच संदीप सातव यांनी सांगितले. यावेळी सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच संदीप सातव, माजी सरपंच जयश्री सातव, सदस्या कविता दळवी, वंदना दाभाडे, रेश्‍मा पाचर्णे, पूजा भाडळे, सुनीता सातव, मालती गोगावले, ज्योती पाचर्णे, ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)