अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव

आता लक्ष स्थायी समितीच्या निर्णयाकडे

पुणे – अंगणवाडी शिक्षिका आणि सेविका यांच्या कामकाजाची वेळ पाच तास आहे. तर प्राथमिक शाळेतील शिक्षिकांची कामाची वेळ सहा तास आहे. मात्र, केवळ एक तासांच्या कमी कालावधीमुळे बालवाडी शिक्षिका आणि सेविकांची सेवा अर्धवेळ धरली जात आहे. त्यामुळे त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे, या पार्श्‍वभूमीवर अंगणवाडी शिक्षिका आणि सेविका यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीच्या समोर ठेवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्या अंगणवाडी सेविका आणि शिक्षिकांना सुधारित वेतनश्रेणी मंजूर केली आहे. त्याशिवाय राज्यातील भाईंदर, खोपोली, इचलकरंजी, नवी मुंबई अशा ठिकाणी 11 हजार ते 16 हजार रुपयांपर्यंतचे मानधन देण्यात येत आहे. याबाबत नगरसेबिका अर्चना पाटील आणि नगरसेवक राहूल भंडारे यांनी महापालिकेच्या स्थायी समितीला याबाबतचा प्रस्ताव दिला आहे.

अंगणवाडी शिक्षिका आणि सेविका यांच्या मानधनात 2016 पासून वाढ झालेली नाही. त्यांना कोणत्याही वैद्यकीय अथवा प्रसूती रजाही दिल्या जात नाहीत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करुन अंगणवाडी शिक्षिका आणि सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. तसेच त्यामध्ये दरवर्षी दहा टक्के वाढ करुन या शिक्षिका आणि सेविका यांना वैद्यकीय सेवा आणि सहा महिन्यांची प्रसूती रजा देण्यात यावी, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)