अंगणवाडीसेविकांना पगारवाढ देण्याची अट बदलली

संग्रहित फोटो

मुख्यसभेत दहा वर्षे केली अट

पुणे – महापालिकेच्या शाळेतील बालवाडी शिक्षिका तसेच अंगणवाडी सेविकांना पगारवाढ देण्याची अट गुरुवारी मुख्य सभेत बदलण्यात आली. स्थायी समितीने ठेवलेली 15 वर्षाची अट मुख्यसभेने दहा वर्षे केली. अधिकाधिक शिक्षिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच सहा महिन्यांची प्रसुती रजाही देण्याची उपसूचना मान्य करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बालवाडी शिक्षिका तसेच अंगणवाडी सेविकांचे धोरण प्रशासनाने तयार केले आहे. या धोरणाला मान्यता देताना स्थायी समितीने 15 वर्षापेक्षा अधिक सेवा झालेले आणि 15 वर्षापेक्षा कमी सेवा झालेले असे दोन स्तर तयार केले होते. मुख्यसभेत हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आला होता. त्यावेळी स्थायी समितीने मंजूर केलेली 15 वर्षाची अट रद्द करून 10 वर्षे करण्याबरोबरच त्यांना सहा महिन्याची प्रसुती रजा देण्यात यावी, अशा उपसूचना देण्यात आल्या. त्याला एकमताने मंजुरीही देण्यात आली. त्यामुळे 10 वर्षांहून कमी सेवा झालेल्या बालवाडी शिक्षिकांना दहा हजार रुपये आणि सेविकांना साडेसात हजार रुपये मानधन मिळणार आहे.

याशिवाय 10 वर्षांहून अधिक सेवा झालेल्या शिक्षिकांना अकरा हजार पाचशे रुपये आणि सेविकांना साडेआठ हजार मानधन मिळणार आहे. तसेच प्रत्येक दोन वर्षांनी यामध्ये 10 टक्‍के दरवाढ देण्यात येणार आहे.

या कर्मचाऱ्यांना दहा नैमित्तिक रजा मिळणार आहेत. 180 दिवस प्रसुती रजा, शहरी गरीब योजनेच्या सभासदत्वासाठी उत्पन्नाची अट शिथिल, गाडीखान्यातून विनामूल्य औषधे, महापालिका रुग्णालयात विनामूल्य औषधोपचार या सुविधा मिळणार आहेत. मराठी, उर्दू, इंग्रजी आणि कन्नड माध्यमांच्या 515 बालवाडी शिक्षिका आणि 423 बालवाडी सेविकांना याचा लाभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)