झोरामथंगा यांनी घेतली मिझोरामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

तिसऱ्यांदा स्वीकारली राज्याची धुरा

ऐझावल: मिझो नॅशनल फ्रंटचे (एमएनएफ) अध्यक्ष झोरामथंगा यांनी शनिवारी मिझोरामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्याकडे तिसऱ्यांदा त्या राज्याची धुरा आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपाल के.राजशेखरन यांनी झोरामथंगा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्या समवेत 11 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यातील तावन्लुईया उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमएनएफने स्पष्ट बहुमत मिळवताना मिझोरामची सत्ता काबीज केली. त्यामुळे मिझोरामच्या सत्तेवरून पायउतार व्हावे लागलेल्या कॉंग्रेसचा ईशान्य भारतातील अखेरचा बालेकिल्लाही ढासळला.

मिझोराममध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. त्यातील 26 जागा एमएनएफने पटकावल्या. दरम्यान, एमएनएफ भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि ईशान्य लोकशाही आघाडीमधून (एनईडीए) बाहेर पडणार नसल्याचे झोरामथंगा यांनी स्पष्ट केले. एनडीएचा घटक असूनही एमएनएफने विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती टाळली होती. त्या निर्णयाचे समर्थन करताना झोरामथंगा यांनी दोन्ही पक्षांच्या विचारसरणी वेगळ्या असल्याचे म्हटले होते. अर्थात, राष्ट्रीय राजकारणापुरते एनडीएबरोबर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)