#Ban_v_Zim 2nd Test : मुशफिकुर रहीमचे व्दिशतक, बांगलादेश 522/7 घोषित

मीरपूर – बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसरा कसोटी सामना मीरपूर येथील शेरे बांग्ला आंतरराष्ट्रीय स्टेडियम सुरू आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात झिम्बाब्वे संघाने 1 बाद 25 धावा केल्या असून झिम्बाब्वे संघ अजूनही 497 धावांनी पिछाडीवर आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा झिम्बाब्वेचे फलंदाज ब्रायन चारी 10 आणि डोनाल्ड टिरिपनो 0 धावांवर खेळत होते. सलामीवीर हॅमिल्टन मसाकादाजा 14 धावा काढून बाद झाला.

-Ads-

नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 7 बाद 522 धावांवर आपला डाव घोषीत केला. मुशफिकुर रहीमच्या नाबाद 219 तर मोमिनुल हकच्या 161 धावांच्या जोरावर बांगलादेशच्या संघाने 522 धावसंख्या उभारली.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेने जिंकला असून मालिकेत झिम्बाब्वेने 1-0 ने आघाडी घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)