तीन विभागांत अतिरिक्‍त पदावरच “चालढकल’

जिल्हा परिषदेत कामाची गती मंदावली : शिक्षण, समाजकल्याण, बांधकाम विभागातील स्थिती

पुणे – जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या विभागांमध्ये शिक्षण, समाजकल्याण आणि बांधकाम विभाग यांचा क्रमांक अग्रस्थानी लागतो. त्यामध्ये शिक्षण आणि बांधकाम विभागाच्या कामाची व्याप्ती मोठी आहे. परंतू, या तीनही विभागांचा कारभार “अतिरिक्‍त’ पदावर’ सुरू आहे. त्यामुळे कामाची गती मंदावली असून, नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे या विभागाला अधिकृत अधिकारी कधी मिळणार, अजून किती दिवस जिल्हा परिषद “अतिरिक्‍त’ पदावर चालवणार, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

-Ads-

राज्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद म्हणून पुणे जिल्हा परिषदेची ओळख आहे. नेहमी “रोल मॉडेल’ ठरत असलेल्या जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक बदल करून कामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, लाचखोरी प्रकरणात अटक आरोपींनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे नाव घेतले. त्यानंतर शिक्षण विभागाला ग्रहण लागले. चौकशी अहवालात शिक्षणाधिकारी यांच्या कामाबाबत साशंकता निर्माण करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेत चांगलेच वातावरण तापले.

दरम्यान, तत्कालीन शिक्षणाधिकारी यांची बदली झाली. त्याला दोन महिने झाले. तरी अद्याप शासनाच्या वतीने नवीन शिक्षणाधिकारी पदाची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे आत्तापर्यंत तीन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्‍त पदभार सोपवण्याची वेळ आली. परंतू, शिक्षण विभागाच्या कामाची व्याप्ती पाहता त्याठिकाणी पूर्णवेळ शिक्षणाधिकारीच पाहिजे.
शिरूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकरण बांधकाम विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काटकर यांना चांगलेच भोवले. जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत आणि स्थायी समितीच्या बैठकीत संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी केली. त्यामुळे या कचाट्यातून सुटण्यासाठी काटकर यांनी स्वत:ची बदली करून घेतली. त्यालाही एक महिना होत आला. दोन विभागाची ही अवस्था आहे.

चार दिवसांपूर्वीच समाजकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कोरगंटीवार यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला. मुळात अनेक महिन्यांपासून समजाकल्याण विभागाचा कोरगंटीवार यांच्याकडे अतिरिक्‍त पदभार आहे. मात्र, तोही त्यांच्याकडून काढून घेतल्यामुळे जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या तीनही विभागांनी “मान’ टाकली आहे. त्यामुळे कामाची गती मंदावली आहे. या विभागांना ऊर्जितावस्था देण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी गरजेचे आहे.

जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाच्या विभागामध्ये ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन याबरोबरच शिक्षण, बांधकाम आणि समाजकल्याण हे तीन विभाग येतात. त्याचबरोबर महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, आरोग्य हीदेखील महत्त्वाचे विभाग आहेत. परंतू, सध्या शिक्षण, बांधकाम आणि समाजकल्याण विभागाला अधिकृत अधिकारी नसल्यामुळे अतिरिक्‍त पदभारावर या विभागाचे कामकाज सुरू आहे. राज्य शासनाकडून बदली झालेल्या ठिकाणी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्‍ती न केल्यामुळे या विभागाकडे असलेल्या सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)