जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी दुसऱ्या दिवशीही संपावरच

पुणे – राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी तीन दिवस संप पुकारला आहे. या संपाचा दुसरा दिवस होता. पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे आठ हजार कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील 84 बुधवारी कामावर रुजू झाले आहेत.

दरम्यान, काही कार्यालयांमध्ये कर्मचारी नसल्यामुळे कामांमध्ये अडथळे आले. परंतु, संपाबाबत नागरिकांना माहिती असल्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयात फारशी वर्दळ नव्हती. या संपामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश होता. तर, जिल्हा परिषदेतील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा दुसऱ्या दिवशीही बंदच राहिल्या तर गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनीच सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन केल्याने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)