२९ रुग्णांची ‘झिका’ टेस्ट पॉसिटीव्ह

राजस्थान: राजस्थान येथील जयपूर मध्ये ‘झिका’ विषाणूने बाधित असलेले २९ रुग्ण सापडले आहेत. झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्याने जयपूर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत बोलताना आरोग्य विभागाने काळजी करण्यासारखी परिस्थिती नसल्याचा निर्वाळा केला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

राजस्थान मध्ये झिकाचे रुग्ण आढळल्याची दखल प्रधानमंत्री कार्यालयाने घेतली असून याबाबतचा अहवाल आरोग्य मंत्रालयाकडून मागवण्यात आला आहे.

दरम्यान झिका विषाणूची लग्न झालेला एक रुग्ण बिहारमधील सिवान जिल्ह्यातील राहवाशी असून तो नुकताच त्याच्या मूळ गावी जाऊन आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून बिहार सरकारने सदर रुग्णाच्या कुटुंबियांच्या आरोग्य विषयक चाचण्या करून घेतल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)