जिया खान मृत्यूप्रकरण : रबिया खानची याचिका फेटाळली

ब्लॅकबेरी सर्व्हरमधील मेसेज तपासण्याचे निर्देश देण्यास नकार

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिनेता सूरज पांचोली यांच्या ब्लॅकबेरी फोनमधील डेटा तपासण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. न्यायालयाने जिया खानची आई रबिना खान हिने याचिकेत केलेल्या आरोपांमध्ये तथ्थ नसल्याचे मत व्यक्त करून याचिका फेटाळली.

-Ads-

साल 2013मध्ये जिया खानने आत्महत्या करण्यापूर्वी सूरजने जियाला पाठवलेल्या ब्लॅकबेरी मेसेजेसमधून अनेक गोष्टी स्पष्ट होतील आणि जियाच्या मृत्यूसाठी तिचा प्रियकर सूरज पांचोलीच जबाबदार आहे, हे स्पष्ट होईल, असा दावा करत जियाची आई राबिया खानने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती मृदूली भाटकर यांच्यासमोर आज सुनावणी झाली. यावेळी रबिना हिने केलेले दावे अमान्य करून ब्लॅकबेरी सर्व्हरमधील मेसेज तपासण्याचे निर्देश देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)