“झिरो’ सहज 350 कोटी कमवेल 

शाहरुखचा बुटक्‍याचा रोल असलेल्या “झिरो’चे प्रॉडक्‍शन आनंद एल रॉय सध्या खूप वेगाने करत आहेत. शाहरुख, कतरिना आणि अनुष्काचे लीड रोल असलेया “झिरो’चे प्रॉडक्‍शन करताना खूप मजा आली आणि हा सिनेमा स्क्रीनवर बघण्यासही खूप मजा येईल, असे आनंद एल राय म्हणाले आहेत. “झिरो’मध्ये कोणतीही त्रुटी राहू नये याकडे आनंद एल राय कटाक्षाने लक्ष देत आहेत. शाहरुखला बुटक्‍याच्या रोलमध्ये दाखवण्यासाठी खूप तांत्रिक कौशल्य वापरण्यात आले आहे. शाहरुखच्या रोलसाठी “व्हीएफएक्‍स’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
आनंद एल.राय यांची आतापर्यंत “मुक्केबाज’, “मेरी निम्मो’, “हॅप्पी फिर भाग जायेगी’ आणि “मनमर्जियां’ हे चार सिनेमे रिलीज झाले आहेत. यातील बहुतेक सिनेमांना बॉक्‍स ऑफिसवर जेमतेम यश मिळाले आहे. आता “झिरो’मात्र त्याला अपवाद ठरणार आहे. बुटक्‍या शाहरुखच्या या रोलला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळेल. बॉक्‍स ऑफिसवर किमान 350 कोटी रुपयांची कमाई “झिरो’ करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला आहे. दुसरीकडे शाहरुखच्या “जब हॅरी मेट सेजल’लाही बॉक्‍स ऑफिसवर फारसे चांगले यश मिळाले नव्हते. त्यामुळे शाहरुख आणि आनंद एल राय या दोघांसाठी “झिरो’ला चांगले यश मिळणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)