‘या’ चित्रपटातून झीनत अमान करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन

मुंबई – सत्तर आणि ऐंशीच्या दशकात आपल्या ग्लॅमरस भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री ‘झीनत अमान’ लवकरच बॉलिवूडमध्ये पुरागमन करणार आहेत. दिग्दर्शक आशुतोश गोवारीकर यांच्या आगामी ‘पानिपत’ चित्रपटात झीनत अमान भूमिका साकारणार आहेत.

मात्र, या चित्रपटात झीनत यांचा लूक कसा असेल, याबाबत सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. झीनत अमान यांनी यापूर्वी 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गावही’ चित्रपटात आशुतोश गोवारीकर बरोबर काम केले होते.

पानिपत चित्रपटाची कथा अफगाण आणि मराठ्यांमध्ये झालेल्या तिसऱ्या महायुद्धावर आधारित असणार आहे. याचित्रपटात बॉलिवूडचे अनेक दिग्ज चेहरे प्रेक्षकांना दिसणार आहेत. अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर तसेच, अभिनेत्री क्रिती सेनन देखील चित्रपटात दिसून येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here