आणखी एका गुन्ह्यात झरदारी यांना अटक

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष असिफअली झरदारी यांना आज आणखी एका भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आली. ते सध्या नॅशनल अकाऊंटीबिलीटी ब्युरोच्या कस्टडीत आहेत. त्यांच्यावर कोट्यावधी रूपयांचा मनि लॉड्रिंगचा आरोप आहे. झरदारी यांच्या भगिनींवरही हा आरोप असून त्यांनी 150 दशलक्ष रूपयांची रक्कम बेनामी बॅंक खात्यांवर भरली आहे.

यावेळी त्यांना लंडन येथे पार्क लेन भागात बेनामी संपत्ती केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे. झरदार हे पाकिस्तानातील पाकिस्तान पिपल्स पार्टी या राजकीय पक्षाचे सहअध्यक्ष आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे दाखल असून त्यातील काहीं अद्याप चौकशीच्या पातळीवरच आहेत. तर काही गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक झाली आहे. मागच्या आठवड्यात त्यांना अटकेत असतानाही संसद अधिवेशनाला उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली.

आपल्या अटकेमुळे लोकांमध्ये घबराटीची भावना निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. आपली त्वरीत सुटका केली जावी अशी मागणी त्यांनी संसदेत केली. झरदारी हे सन 2008 ते 2013 या काळात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)