सत्यजीत तांबे यांनी फासले मोदींच्या फोटोला काळे

संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संगमनेर – युवक कॉंग्रेसच्या वतीन पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देत प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल पंपावरील उज्ज्वल गॅसच्या फलकावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला तांबे यांनी काळे फासण्यात आले. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

संगमनेर विधानसभा युवक कॉंग्रेसने आयोजित केलेल्या आंदोलनात तांबे यांनी स्वत: सहभाग घेतला. त्यांनी शहरातील ऐश्वर्या पेट्रोल पंपावर लावलेल्या फलकावरील मोदींच्या फोटोला काळे फासून सरकारच्या लुटीचा निषेध केला. यावेळी बहुसंख्येने युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

तांबे म्हणाले, मोदी सरकार पेट्रोल, डिझेलची दरवाढ करून जनतेची फसवणूक करत आहे. रोज 30 ते 40 पैश्‍यांनी दरवाढ करायची आणि दोन तीन महिन्यात एकदा दोनचार रुपयाने भाव कमी करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची. पेट्रोल, डिझेलला जी.एस.टी लागू झाला तर सर्वसामान्यांना 25 ते 30 रुपयाने स्वस्तात मिळणार आहे. इतिसातील सर्वाधिक दराने आज पेट्रोल डिझेल विकले जाते, ही सामान्य माणसाची लुट नाही तर मग काय आहे? असा प्रश्न तांबे यांनी केला आहे. यावेळी वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’ अशी घोषणा देण्यात आली.

यावेळी निखिल पापडेजा, आनंद वर्पे, शैलेश कलंत्री, नूरमोहम्मद शेख, योगेश जाजू, अनिस शेख, गौरव डोंगरे, निलेश शिंदे, बाळासाहेब गुंजाळ, सुहास आहेर, नितीन अभंग, दत्तू कोकणे, अफजल शेख, संतोष मांडेकर, रमेश नेहे, अंबादास आहेर, वैष्णव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे सचिन खेमनर, प्रतीक शिंदे, अमित गुंजाळ, विजय उदावंत, सोमा गडाख, अनिल गोर्डे, महेंद्र गुंजाळ, पांडुरंग खेमनर, तुषार वनवे, सत्यम खेमनर, लाला दायमा, खालिद मिर्जा, परबत शिंदे, सागर कानकाटे, अक्षय दिघे, रमेश दिघे, अमित मंडलिक, निलेश शिंदे, सादिक तांबोळे, शिवाजी जगताप, मुस्ताक शेख, सोपान डोळझाके युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)