युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा :पोलंडवर मात करत भारतीय महिला संघ उपान्त्य फेरीत

ब्युनोस आयरिस – अर्जेंटिनातील ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या र्धीीेंह जश्रूाळिल स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय महिलांनी पोलंडला 3-0 ने हरवलं. भारताकडून लारेमिसामी, कर्णधार सलिमा टेटे आणि बलजीत कौर यांनी गोल झळकावले.

पहिल्या सत्रात पोलंडच्या महिला खेळाडूंनी काही चांगल्या चाली रचत गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र भारतीय गोलकिपरने पोलंडचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर भारतीय खेळाडूंनी सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. यानंतर पोलंडच्या महिलांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच मिळाली नाही.

-Ads-

तत्पूर्वी “अ’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 5-2 असा पराभव करून युवा (18 वर्षांखालील) ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील हॉकी प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. अर्जेटिनाविरुद्ध एकमेव पराभव स्वीकारावा लागल्याने भारताला गटात 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतातर्फे मुमताझ खानने दोन, तर रीट, लार्लेमसिआमी आणि इशिका चौधरी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.

सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय महिलांनी आक्रमणावर भर दिला. मुमताझने दुसऱ्याच मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. मात्र आफ्रिकेच्या कायला डी वालने 10व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. रीटने पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटात गोल करून मध्यांतराला भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्रात लार्लेमसिआमीने (12वे मिनिट) संघासाठी तिसरा व वैयक्तिक पहिला गोल नोंदवून आघाडी वाढवली. इशिकानेही पुढच्याच मिनिटाला गोल करून भारताचा विजय जवळपास निश्‍चित केला. मुमताझने 17 व्या मिनिटाला संघासाठी पाचवा गोल करून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्‍चित केला. आफ्रिकेतर्फे अँजेला वेलहॅमने दुसरा गोल नोंदवला. मात्र तोपर्यंत त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले होते.

दरम्यान या पुर्वीच्या साखळी सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला स्पर्धेत पहिल्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले होते. यजमान अर्जेंटिनाने भारतीय महिलांवर 5-2 अशी एकतर्फी मात करत भारताला पराभुत केले होते. पहिल्या तीन सामन्यांमध्ये सहज विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांना पहिल्यांदाच कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)