बॉलिवूडमध्ये आर्मीवरील सिनेमे आणखी बनावेत : यामी गौतम

सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत “उरी’ हा यामी गौतमचा सिनेमा रिलीज झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतो आहे. “उरी’बाबत बोलताना ती म्हणाली की आपण कधीच आक्रमक राहिलेलो नाही. “उरी’च्या हल्ल्यानंतर प्रथमच दहशतवादाविरोधात आक्रमक पाऊल उचलले गेले होते. हा “सर्जिकल स्ट्राईक’ कोणत्याही देशाच्या नागरिकांविरोधात नव्हता, तर दहशतवाद्यांविरोधात होता. त्यामुळे त्या सर्जिकल स्ट्राईकला एक नागरिक म्हणून आपणही पूर्ण पाठिंबा द्यायला हवा.

देशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांप्रती आपल्या नागरिकांच्या मनातील आदर आणखी उंचावण्यासाठी “उरी’चा प्रयत्न आहे. देशातील युवकांच्या मनात लष्कराबाबत जो आदर आहे, तो वाढवण्यासाठी बॉलिवूडमध्ये लष्कराच्या कामगिरीवर आणखी सिनेमे बनण्याची आवश्‍यकता आहे. केवळ स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिवसालाच देशप्रेमाचे भरते येऊन चालणार नाही. “उरी’सारख्या सिनेमाच्या माध्यमातून आपण आपल्या सैन्याला धन्यवादच दिले असल्याचे तिने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लष्कराच्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी एक निधी उभारण्यातही तिने योगदान द्यायला सुरुवात केली आहे. बऱ्याच दिवसांनी बॉलिवूडमध्ये पुन्हा पडद्यावर झळकणाऱ्या यामी गौतमला आता भविष्यात “उरी’सारख्या अशा सिनेमांची संख्या वाढणे आवश्‍यक वाटते. या सिनेमासाठी यामी गौतमने आपला लुक पूर्णपणे बदलून टाकला आहे. तिने आपले केस खूप बारीक कापले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)