वायएसआर कॉंग्रेस नेत्याचा संशयास्पद मृत्यू

अमरावती: आंध्रप्रदेशातील वायएसआर कॉंग्रेसचे नेते वाय. एस. विवेकानंद रेड्डी हे आज त्यांच्या निवासस्थानी संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळले. आंध्रप्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे ते बंधु आहेत. त्यांच्या कडाप्पा जिल्ह्यातील घरात ही घटना घडली. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही असे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. या प्रकरणी दिवंगत विवेकानंद रेड्डी यांचे स्वीय सहायक एम.व्ही कृष्णा रेड्डी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या बाथरूम मध्ये आणि बेडरूम मध्ये रक्ताचे डाग लागले असल्याचे दिसून आले असून त्यांचा मृत्य नेमका कसा झाला याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

68 वर्षीय विवेकानंद यांच्या मागे पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या संशयास्पद मृत्यूची कसून चौकशी करण्याची मागणी त्यांचे पुतणे वाय. एस अविनाश रेड्डी यांनी केली आहे. ते म्हणाले की त्यांच्या डोक्‍यावर दोन ठिकाणी वार झाल्याच्या खुणा आहेत. ही घटना घडली त्यावेळी ते घरात एकटे होते. वायएसआर कॉंग्रेसचे प्रमुख जगमोहन रेड्डी यांना ही बातमी कळताच त्यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)