यूट्यूबचा बनावट बातम्या रोखण्यास प्रयत्न

न्युयार्क: गुगलच्या व्यासपीठ असणारी व्हिडीओ कंपनी युटयूबकडून बनावट बातम्यांना रोखण्याकरीता अडीच कोटीची गुंतवणूक करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करत अनेक बनावट बातम्यांचा पेव अलीकडे वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. याला रोखण्याकरिता कंपनी समोर मोठे आव्हान असणार आहे. कंपनीकडून येत्या काळात याला निर्बंध घालण्यासाठी कोटयवधीची गुंतवणूक करण्यात येऊन बातम्यांना अधिक विश्वसनीयता राखण्यासाठी कंपनी आनोख्या योजना राबवणार आसल्याची माहिती युटट्युब कंपनीने दिली आहे. व्हिडीओ सर्च केल्यानंतर त्यामधून देण्यात येणारी माहिती चुकीची असल्यास त्याचा वाईट परिणाम समाजात होण्याची शक्‍यता असते. त्यामधून समाजात तयार होणारा अविश्वास कमी होण्यास मदत होणार असल्याचा अंदाज कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

जगभरातील वृत्तसंघटनामध्ये टिकाऊपणा आणि विश्वास निर्माण करण्याकरीता या व्यवसायाशी संबंधीत कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देऊन युटयुबशी संबंधीत तयार करण्यात येणारे व्हिडीओमध्ये सुधारणा होण्यास मदत मिळणार आसल्याचेही कंपनीकडून यावेळी नोंदवण्यात आले. भारतात सोशल मिडियाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या अफवामुळे हिंसाचाराचे प्रकार घडत आहेत. त्याला मर्यादा घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)