पोलिसाच्या नावे चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

हडपसर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख

पुणे – पोलिसाच्या नावाने चिठ्ठी लिहून एकाने राहत्या घरी गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला. स्वप्नील दशरथ संपकाळ ( 32 रा. जोंधळेनगर) असे या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार 10 मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला आहे. जमिनीच्या आर्थिक वादाची किनार या प्रकरणाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी राजेंद्र बाळासाहेब मोरे (वय-42, रा फुरसुंगी, हडपसर) याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दशरथ संपकाळ (वय-64,रा. वारेवडगाव, ता. भूम, जि. उस्मानाबाद) यांनी तक्रार दिली आहे.

-Ads-

आत्महत्येपूर्वी मयत संपकाळ यांनी एक चिठ्ठी लिहली असून त्यामध्ये हडपसर पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. जमीन व्यवहारात पोलिसांनी तक्रार घेतली नसून प्रकरणाची चौकशी व्यवस्थित न केल्याचा आरोप या तरुणाने पोलिसांवर केला आहे. आपण घेत असलेल्या निर्णयाबाबात संपकाळ यांनी घरच्यांची माफी मागितली असून, आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई करा, असे त्यात म्हटले आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपकाळ यांनी आपण राहत असलेल्या परिसरातील राजेंद्र मोरे नावाच्या व्यक्तीसोबत 2017 पासून जमिनीसंदर्भात आर्थिक वाद सुरू होता. याबाबत संकपाळ यांनी एक अर्ज हडपसर पोलीस ठाण्यात दिला होता. सन 2016 मध्ये संपकाळ यांनी राजेंद्र मोरे याच्याकडून प्लॉट खरेदी केला होता. मात्र या व्यवहारात संपकाळ यांची आर्थिक फसवणूक झाली. यामुळे मागील काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते. त्यामुळे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहलेल्या व्हॉट्‌स ऍप मेसेजची योग्यप्रकारे चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्वप्नीलच्या वडिलांनी केली आहे.

संबंधित प्रकरण दिवाणी स्वरुपाचे असल्यामुळे त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. याबाबत देण्यात आलेल्या समज पत्रावर संकपाळ यांची सहीदेखील आहे. त्यामध्ये संपकाळ यांनी दिवाणी न्यायालयात जाऊन दाद मागावी, असा उल्लेख करण्यात आला आहे. राजेंद्र मोरे नावाच्या व्यक्तीमुळे मी आत्महत्या करत असून, ज्या अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख चिठ्ठीत आहे त्यांनी प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे केली नसल्याचे संपकाळ यांनी म्हटले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करुन त्यांच्या तपासामध्ये काही निष्काळजीपणा आहे का, हे देखील पाहण्यात येणार आहे.
– सुनील तांबे, वरिष्ठ निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)