ममता बॅनर्जी याच्यांविरूध्द फेसबुकवर अपमानजनक प्रतिक्रिया, युवकाला अटक

नवी दिल्ली – पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच्यां  विरूध्दात फेसबुकवर अपमानजनक प्रतिक्रिया लिहिल्याच्या अारोपाखाली पोलीसांनी एका युवकाला अटक केली आहे. उत्तर त्रिपूरामधील धलाई जिल्ह्यातील अम्बासा येथून युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या युवकाने रोहिंग्या प्रकरणी फेसबुकवर ममता बॅनर्जी यांच्यावर आपमानजनक भाषा वापरत प्रतिक्रिया नोंदवली होती.

मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेला युवक हा ठाकूर पल्ली येथील राहणारा असून त्याचे नाव तुषार शर्मा असे आहे. त्याच्यावर आरोप आहे की, या वर्षीच्या 14 एप्रिल रोजी रोहिंग्या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच्यां विरूध्द चुकीची भाषा वापरत अपमानजनक प्रतिक्रिया केली होती.

-Ads-

त्यानंतर पश्चिम बंगालचे मंत्री ब्रत्या बासू यांनी तीन दिवसानंतर 17 एप्रिलला विधाननगर या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर विधाननगर पोलीसांनी त्याला अटक केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)