“साहो’साठी प्रभासने घटवले आपले वजन

बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर अभिनेता प्रभास आता आपल्या आगामी “साहो’ चित्रपटातून चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. “साहो’च्या निर्मात्यांनी नुकत्याच “शेड्‌स ऑफ साहो’ची मालिका प्रसिद्ध केली होती. यामध्ये चित्रपटाच्या निर्मितीची झलक दिसून येते, या दोन्ही अध्यायांमध्ये कास्टची झलक दिसत आहे. या मालिकेत व्हिडिओचे ऍक्‍शन आणि “स्टाईलिश लुक’ प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

या चित्रपटासाठी अभिनेता प्रभासने खूप मेहनत घेतली आहे. प्रभासने तब्बल 7 ते 8 किलो वजन कमी केले आहे. चित्रपटात वजन घटविण्यासाठी त्याने खास आहार योजना तयार केली होती. तसेच जिममध्ये देखील घाम गाळला आहे.
ऍक्‍शन थ्रिलर “साहो’मध्ये बाहुबली मेगास्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची जोडी पाहण्यासाठी उत्सुक आहे. हा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये चित्रिकरण करण्यात आले आहे.

दरम्यान, “साहो’चे दिग्दर्शन सुजीत यांनी केले असून प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्यासह नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे ही मनोरंजनचा तडका लगावताना दिसणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)