‘तुमचा पीएम आमचा सीएम’ ही तर मुंगेरीलालची हसीन स्वप्ने – नवाब मलिक

File photo

मुंबई: देशात आणि राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता येणार नाहीये. त्यामुळे ‘तुमचा पीएम आमचा सीएम’ हे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखेच असेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेना-भाजपाला लगावला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘तुमचा पीएम आमचा सीएम’ असं वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना मलिक बोलत होते.

कालपर्यंत संजय राऊत आमचा सीएम आणि पीएम तुमचा असे सांगत होते. उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री आमचाच होईल असे सांगत होते. पण, देशात आणि राज्यात जनता सत्ता परिवर्तन करू इच्छित आहे. लोकसभा असो की विधानसभा, शिवसेना- भाजपाचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त करतानाच स्वप्ने पाहण्यापासून कुणीच कुणाला थांबवू शकत नाही, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)