वाघळवाडी’च्या तरुणांनी दिले काळवीटाला जिवदान…

सोमेश्वरनगर: कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळवीटाला वाघळवाडी’च्या तरुणांनी चलाखीने वाचवले आणि औषधोपचार करून वनरक्षकाच्या स्वाधीन केले.

याबाबत अधिक वृत्त असे, कि सोमवारी दुपारी वाघळवाडी’च्या माळरानावर सह्याद्री महाविद्यालयाच्या मागील बाजुस कुत्र्यांची धावपळ चालली होती. येथे काम करणारे बाळु निवृत्ती चौधरी, आदीनाथ शिंदे, विजय सुदाम सावंत, अमोल भुजबळ, या युवकांनी कुत्र्याचा ताफा एका काळवीटाच्या मागे धावत असताना पाहीले. सर्वजण वेगात त्या कुत्र्याच्या मागे धावले दरम्यान कुत्र्यानी त्या कळविटाला आपल्या भक्ष्यस्थानी घेतलेच होते. तेवढ्यात या तरुणांनी कुत्र्याना काठीचा व दगडाचा धाक दाखवत बाजुला केले. आई किरकोळ जखमी झालेल्या कळविटाला त्यांच्या तावडीतुन सोडविले.

त्यानंतर वनरक्षक योगेश कोकाटे, वनाधिकारी सुपेकर, वनकर्मचारी नंदकुमार गायकवाड यांना सदर घटनेची माहीती दिली. त्यानी घटनास्थळी धाव घेतली व त्या काळवीटाला औषधोपचार करुन पुन्हा जंगलात सोडले. या माळरानावर असलेल्या काळवीटाच्या सरक्षणासाठी या तरुणानी केलेल्या धावपळीत वन्यजीवांचे सरक्षंण केल्याबद्दल अनेकानी विजय सुदाम सावंत व त्यांच्या सहकारी मित्रांचे कौतुक केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)