भाजपासारखी तुम्हालाही संधी मिळेल : शेख हसिनांचा विरोधकांना टोला

भारतातल्या कॉंग्रेस पक्षाचेही दिले उदाहरण

ढाका: घवघवीत यश मिळवीत तिसऱ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या शेख हसिना यांनी आपल्या विरोधकांविरोधात चांगलीच राजकीय टोलेबाजी केली. त्यासाठी त्यांनी भारतात सत्तेत असलेल्या भाजपाचे उदाहरण दिले आहे. 2 जागा असलेली भाजपा आज सत्तेत आहे. तशीच संधी तुम्हालाही मिळेल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पत्रकारांना मुलाखत देताना हसीना म्हणाल्या, मला कधीही वाटलं नव्हतं की मी पुन्हा सत्तेत येईल’. बांगलादेशात राजकीय विरोधक शिल्लक राहिले नसल्याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर त्या अतिशय शांत आणि विनोद करताना आढळल्या. विरोधकांची खिल्ली उडवताना त्यांनी भारतातल्या कॉंग्रेस पक्षाचेही उदाहरण दिले. गेल्या निवडणुकीत त्यांनी किती जागा मिळवल्या? सर्वात जुन्या आणि स्थिरस्थावर असलेल्या पक्षाने पंतप्रधान कोण होईल याकडे लक्ष दिले नाही. त्यांच्या पक्षाचा नेता कोण असेल हे स्पष्ट नव्हते. त्यामुळे लोकांनी त्यांना मतं दिली नाहीत.

पुढे भाजपाचे उदाहरण देताना हसिना म्हणाल्या, तुम्हाला आठवते का जेव्हा राजीव गांधी निवडणूक जिंकले तेव्हा भाजपाला केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर सध्या ते सत्तेत आहेत. अशा प्रकारे जर विरोधकांची योग्य प्रकारे काम केले तर त्यांनाही पुन्हा सत्तेत येण्याची संधी आहे.

शेख हसिना यांच्या अवामी लीग आघाडी सरकारने बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीत 288 जागा जिंकल्या. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला (बीएनपी) केवळ 7 जागा जिंकता आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)