चांगला संघ असताना तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते – हरमनप्रीत कौर

प्रोव्हिडन्स: महिला विश्‍वचषक टी-20 स्पर्धेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्म मध्ये असून भारतीय संघाने मालिकेतील आपले चारही सामने एकतर्फी जिंकताना गट ब मधून पहिले स्थान पटकावताना उपान्त्य फेरीत धडक मारली असून संघाच्या कामगिरीवर कर्णधार हरमनप्रीत कौर खुश झाली असून तिने संघातील सहकऱ्यांवर स्तुती सुमने उधळली असून चांगला संघ असताना तुम्हाला चांगलीच कामगिरी करावी लागते असेही तो म्हणाला.

जेव्हा तुम्ही चांगल्या संघासोबत खेळत असता तेव्हा आपोआपच तुमच्याकडून चांगली कामगिरी होते. मी माझ्या संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे. आम्ही या स्पर्धेसाठी मेहनत केली, आणि क्षेत्ररक्षणातल्या चुकाही यावेळी टाळल्या. माझ्यात आणि स्मृतीमध्ये झालेली भागीदारी या सामन्यात महत्वाची ठरली. अशीच भागीदारी आमच्यामध्ये आगामी सामन्यांमध्ये होईल याबात मला आशा आहे.

मालिकेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय महिलांनी खराब कामगिरी केली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने चांगले क्षेत्ररक्षण करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला अतिरीक्त धावा काढण्यापासून रोखले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ दडपणात आला होता. आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

त्यातच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने 27 चेंडूत 43 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. सामन्यातील 3 षटकारासह हरमनप्रीतने नवा वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला. स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात हरमनप्रीतने 55.66च्या सरासरीने 167 धावा केल्या आहेत. यात कौरने 12 चौकार आणि 12 षटकार मारले आहेत. वर्ल्डकपमध्ये एका फलंदाजाकडून आतापर्यंत मारण्यात आलेले सर्वाधिक षटकाराचा विक्रम हरमनप्रीतच्या नावावर जमा झाला आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या डेंड्रा डॉटिनच्या नावावर होता. तिने 2010च्या वर्ल्डकपमध्ये 9 षटकार मारले होते. तर ऑस्ट्रेलियाच्या मॅग लार्निंगने 2014 मध्ये 8 षटकार मारले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)