तुमचे शौचालय स्वच्छ करण्यासाठी खासदार झाले नाही – प्रज्ञा साध्वी

प्रातिनिधिक छायाचित्र

भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या वेळी वादग्रस्त वक्‍तव्य करून चर्चेत आलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी ज्या मतदारांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना निवडुण दिले आहे त्यांनाच टार्गेट केले आहे. तुमचे टॉयलेट किंवा गटारे साफ करण्यासाठी मी खासदार झाले नाही असे वादग्रस्त वक्‍तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले आहे. मध्य प्रदेशातील सिहोरमधील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी हे वक्‍तव्य केले आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमधून भाजपच्या तिकिटावर त्या खासदार म्हणून निवडुण आल्या आहेत. सिहोर परिसरातील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी साध्वींकडे आपल्या तक्रारी मांडल्या त्यावेळी त्यांनी आपण प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडू परंतु, टॉयलेट साफ करणे आपले काम नाही असे स्पष्ट उत्तर साध्वी यांनी नागरिकांना दिले.

आम्ही तुमचे गटारे साफ करण्यासाठी नाही आहोत, ठीक आहे ना आम्ही तुमचे शौचालय स्वच्छ करण्यासाठी अजिबात निवडुण आलो नाही तर जे काम करण्यासाठी निवडूण आलो आहोत ते काम प्रामाणिकपणे पार पाडू, असे आम्ही अगोदरही म्हटलो होतो, आजही म्हणतो आणि उद्याही याच वाक्‍यावर आम्ही ठाम असू असे वक्‍तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले आहे. दरम्यान, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देत आहेत तर दुसरीकडे भाजपच्याच खासदारांचे असे वक्‍तव्य समोर येणे हे आश्‍चर्यकारक आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)