तुम्ही सोडवलेला ‘नेट’ परीक्षेचा पेपर असा करा ‘डाउनलोड’

सीबीएसई तर्फे घेण्यात येणाऱ्या ‘नेट’ परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. १८ ते २४ डिसेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या नेट परीक्षांमध्ये देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी आपले नशीब आजमावले होते. एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजेन्सी) मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षांचे विद्यार्थ्यांनी सोडवलेले पेपर ‘एनटीए’च्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांना आपण सोडवलेल्या प्रश्नपत्रिका २८ तारखेपर्यंत डाउनलोड करता येणार आहेत.

प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना www.ntanet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर ‘view question paper and response’ हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर ऍप्लिकेशन नंबर व पासवर्ड अथवा ऍप्लिकेशन नंबर व जन्मतारीख भरून आपण सोडवलेला पेपर पाहता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एनटीएने अधिकृत उत्तरपत्रिकांबाबत (अंसर की) कोणतीही माहिती दिली नसली तरी ३१ डिसेंबर पर्यंत उत्तरपत्रिका उपलब्ध करण्यात येतील अशी माहिती समोर आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)