गोरखपूर मेडिकल काॅलेज आॅक्सिजन खरेदीत महिना 5 लाख रुपयाचा घोटाळा

समाजवादी पक्षाचे योगी सरकारवर आरोप

लखनऊ – समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारवर गोरखपूर मेडिकल काॅलेजमध्ये आॅक्सिजन खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद यादव यांनी आज हे आरोप केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असा दावा केला होता. मात्र त्यांच्याच कर्मभूमी असलेल्या गोरखपूरमधील बाबा राघव दास मेडिकल काॅलेजमध्ये आॅक्सिजन खरेदीत प्रत्येक महिन्याला पाच लाख रूपयाचा घोटाळा होत आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मागील सरकारच्या कार्यकाळात गोरखपूर मेडिकल काँलेज मध्ये 16 रूपये 50 पैसे प्रति लीटर अशा दराने लिक्विड आॅक्सिजन खरेदी केला जात होता. मात्र मागील वर्षाच्या 10 आॅगस्ट नंतर सरकारने राजस्थानच्या एका कंपनीकडून 19 रूपये 39 पैसे दराने गॅस खरेदी करणे सुरू केले. अशाप्रकारे महिना पाच लाख रूपयांचा घोटाळा होत आहे. मेडीकल काॅलेजमध्ये प्रतिमहिना 1.20 लाख ते 1.50 लाख लीटर अाॅक्सिजन वापरला जातो. अाॅगस्ट महिन्यात रोगांचे प्रमाण वाढल्याने आॅक्सिजन जास्त वापरला जातो आणि कधी कधी अधिक मागणी वाढते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)