अमेरिकेत योगा स्टुडिओत गोळीबार ; दोन ठार अनेक जखमी 

मियामी  – फ्लोरिडा राज्याची राजधानी असलेल्या तल्लाहसी शहरातील एका योगा स्टुडिओ मध्ये एका बंदुकधाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जण ठार झाले तर अन्य अनेक जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. तथापी सुरक्षा यंत्रणांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण आणले.

या तत्पर प्रतिसादाबद्दल या शहाराचे महापौर ऍन्ड्रयु गिल्लम यांनी सुरक्षा यंत्रणेचे आभार मानले आहेत. महापौर हे फ्लोरिडा प्रांताच्या गव्हर्नर पदाची निवडणूक लढवत आहेत. त्याच्या प्रचारासाठी ते दौऱ्यावर गेले होते. त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते आपला दौरा रद्द करून शहरात परतले आहेत. त्यांनी या घटनेचा निषेध करून या शहरात बंदुक कल्चर चालवू देणार नाही असे स्पष्ट केले आहे. दरम्यान या गोळीबारानंतर हल्लेखोरांने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. तो नेमका कोण होता हे मात्र अद्याप समजलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)