व्दिपाद उत्तानपादासन (गुडघेदुखी कमी करणारे व स्नायूना मजबूत करणारे)

गुडघेदुखी कमी करणारे व स्नायूना मजबूत करणारे- द्विपाद उत्तानपादासन
-डाॅ. अरविंद कुलकर्णी

हे आसन खास पोटासाठीचे आसन आहे. चित्रातल्या स्थितीप्रमाणे सरळ झोपा. दोन्ही हात अंगालगत ठेवा. दोन्ही पायांच्या टाचा व चौडे जुळवून पाय सरळ स्थितीत ठेवा. धिम्या गतीने श्वास आत खेचा आणि मग हळूहळू पाय वर उचला.

सात ते आठ सेकंदापर्यंत या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. श्वास रोखून धरा आणि मग हळू हळू पाय खाली आणताना श्वास सोडा. स्त्रियांनी हे आसन जर दिवसातून चार वेळा केले तर पोटातील स्नायूंना व्यायाम मिळतो. पचनस्थिती सुधारते. मूळव्याध दूर होते. शरीरातील चरबी कमी होते. बध्दकोष्टता आणि अपचनाच्या तक्रारी दूर होतात. म्हणून स्थूलपणा दूर करण्याचा मान उत्तानपादासनाला दिला आहे.

या आसनामुळे स्वादुपिंड कार्यक्षम बनते. वारंवार ढेकरा येत असतील अथवा वारंवार शौचास लागत असेल किंवा सतत गॅसेसचा त्रास होत असेल तर हे आसन नियमित करावे. थोडावेळ विश्रांती घेऊन परत करावे. उचकी लागत असेल तर हे आसन केल्यामुळे थांबते.

हे आसन सोडताना पाय धपकन खाली आणू नयेत तर सावकाशपणे हळूवार खाली आणावेत. आणि श्वास सोडत पाय खाली आणावेत. लहान मुलांना पोटात जर जंत झाले असतील तर हे आसन करायला शिकवावे. त्यामुळे पोटातील जंत पडून जातात.

स्त्रियांनी कंबर दुखी थांबवण्यासाठी तसेच पाठीदुखत असल्यास हे आसन रोज करावे. पाय सोडताना सर्व शरीर ढिले सोडावे. व सावकाश पाय खाली घ्यावे. पायांच्या टाचा व चौडे हे एक जुळवूनच सरळ स्थितीत ठेवावे. उत्तानपादासनात पाय हळूहळू वर उचलल्यामुळे करोडरज्जू सुढ बनतो. आंतरिक पेशी सशक्त होतात. शरीरातील स्नायूंचे कार्य सुधारते.
स्त्रियांनी हे आसन रोज पाच ते सहा वेळा करावे. मात्र सहा ते आठ सेकंद विश्रांती घेऊन मग पुन्हा पुन्हा हीच क्रिया करावी. श्वासाचे तंत्र सांभाळावे. श्वास संथपणे घेत पाय उचलावे आणि आसनस्थितीत श्वास रोखावा. अथवा संथ श्वसन करावे. आणि श्वास सोडत पाय खाली घ्यावे.

उत्तानपादासन हे सर्वांगासनाची पूर्व तयारी आहे. जर मुळव्याधीची नुकतीच सुरुवात असेल तर या आसनाच्या सरावाने ही व्याधी दूर होण्यास मदत होते.

गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या व्यक्‍तींनी सुरुवातीला जेवढे जमेल तेवढेच एकेक पाय उचलावा. एकदम उंचावर हवेत पाय नेता येत नाही. गुडघ्यांमधून कळ येवू श्‍ ाकते. अशावेळी सावकाश एकेक पाय उचलून एकपाद उत्तांगपादासन प्रथम करावे.

सुरुवातीचे दोन आठवडे एकेक पाय उचलून एकपाद उत्तांगपादासनाचा सराव करावा मग तिसऱ्या आठवड्यापासून द्विपाद उत्तानपादासन तज्ञ योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावे. या आसनामुळे सायू मजबूत होतात व गुडघेदुखी कमी व्हायला मदत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)