योगा कॉलेजच्या चीन मध्ये 50 शाखा सुरू होणार

बिजींग: चीन मधल्या युनान प्रांतात सुरू करण्यात आलेल्या पहिल्या योगा कॉलेजला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादानंतर या कॉलेजच्या संपुर्ण चीन मध्ये 50 नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2015 मध्ये कुनमिंगच्या युनान मिंझु विद्यापीठातर्फे हे स्वतंत्र कॉलेज सुरू करण्यात आले आहे.

चीन मध्ये योगा विषयाचा प्रसार झपाट्याने होत असून त्याचा लाभ अनेकांना झाला असल्याने ते तंत्र शिकुन घेण्याची इच्छा अनेक युवक-युवतीेंनी दाखवल्यामुळे या 50 शाखा सुरू केल्या जाणार आहेत. यातील पहिल्या शाखेचे शनिवारी लिजांग शहरात उद्‌घाटन करण्यात आले. चीन मधील अनेक नागरीक दरवर्षी 21 जूनला साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)