येस बॅंकेचे शेअर कोसळले

परदेशी गुंतवणूकदार सक्रिय : मुख्य निर्देशांकांत बरीच वाढ

मुंबई – तोट्याच्या गाळात अडकलेल्या जेट एअर वेज कंपनीची टाटा सन्सबरोबर बोलणी चालू असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे आज या कंपनीच्या शेअरचे भाव 24 टक्‍क्‍यांपर्यंत उसळले होते. मात्र दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा नफा कमी झाल्यामुळे आज या कंपनीच्या शेअरचे भाव 11 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे दिसून आले. या तिमाहीत कंपनीला 4973 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यामुळे आज इतर मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांच्या शेअरच्या भावातही घट झाली.

-Ads-

येस बॅंकेच्या शेअरचीही आज मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले. या बॅंकेच्या शेअरच्या भावात आज 7.42 टक्‍क्‍यांची घट झाली. बॅंकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष अशोक चावला यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर बॅंकेचे स्वतंत्र संचालक वसंत गजपती यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

क्रुड कमी पातळीवर असल्यामुळे त्याचबरोबर रुपया स्थिर होत असल्यामुळे मुख्य निर्देशांकात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 118 अंकानी म्हणजे 0.34 टक्‍क्‍यांनी वाढून 35260 अंकांवर स्थिरावला. तर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 40 अंकांनी वाढून 10616 अंकांवर विसावला. काल सेन्सेक्‍स 2 अंकानी कमी झाला होता.

क्रुडचे दर कमी होत असल्यामुळे भारतातील तेल शुद्धीकरण आणि वितरण कंपन्याचे शेअर वधारले. ऑक्‍टोबर महिन्यात क्रुडचे दर 86 डॉलर प्रति पिंपावर गेले होते. आता ते 65 डॉलरवर आले आहेत. त्यामुळे रुपयाचा दरही वधारू लागला आहे. परिणामी परदेशी संसंथागत गुंतवणूकदार आता भारताकडे वळू लागल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. आजही रुपयाच्या मूल्यात 44 पैशांची सुधारणा झाल्याचे दिसून आले. या कारणामुळे काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 277 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली. तर देशीाल संस्थागत गुंतवणूकदारांनी 272 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)