फुटीरतावादी नेता यासिन मलिक ताब्यात

श्रीनगर – जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा देणाऱ्या कलम ३५ अ याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी घेणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज फुटीरतावादी नेता यासिन मलिकला ताब्यात घेतले. तर जमात-ए-इस्लामीच्या जवळपास डझनभर नेत्यांना अटक करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले असून कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी फुटीरतावादी नेता यासीन मलिकला निवासस्थानातून ताब्यात घेतले. कोठीबाठ पोलीस ठाण्यात त्याला ठेवण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)