यशवंत सिन्हा, अरूण शौरी, प्रशांत भूषण यांची सर्वोच्च न्यायालयात धाव 

राफेल प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी 

नवी दिल्ली – यशवंत सिन्हा आणि अरूण शौरी या माजी केंद्रीय मंत्र्यांबरोबरच वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी राफेल करारावरून आक्रमक पवित्रा स्वीकारत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी राफेल प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या याचिकेत केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताने लढाऊ जातीच्या राफेल विमानांच्या खरेदीसाठी फ्रान्सशी करार केला. तो करार म्हणजे महाघोटाळा असल्याचा आरोप करत विरोधकांनी आणि विशेषत: कॉंग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात मोहीम उघडली आहे. आता वाजपेयी सरकारमध्ये मंत्रिपद भुषवणाऱ्या सिन्हा आणिर शौरी यांच्याबरोबरच भूषण यांनी राफेलवरून मोदी सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी राफेल प्रकरणी याआधीच सीबीआयकडे तक्रार नोंदवली होती. आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

राफेल करारासंदर्भात सरकारी उच्चपदस्थांनी गुन्हेगारी स्वरूपाची गैरवर्तणूक केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. सीबीआयला कालबद्ध पद्धतीने तपास करण्याचा आणि तपासाचे स्थिती अहवार सादर करण्याचा आदेश द्यावा, असे साकडे त्यांनी न्यायालयाला घातले आहे. राफेलसंदर्भात दोन जनहित याचिका याआधीच दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावरून न्यायालयाने केंद्र सरकारला राफेल कराराशी संबंधित निर्णयप्रक्रियेचा तपशील 29 ऑक्‍टोबरपर्यंत बंद लिफाफ्यात सादर करण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)