यमुना एक्स्प्रेस वेवर बस नाल्यात कोसळून २९ जण ठार

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर एका प्रवासी बसचा आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २९ जण ठार झाले आहेत तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक ठिकाणी पोहचले असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

प्रवासी बस लखनऊ या ठिकाणाहून दिल्लीला जात होती. त्याचवेळी हा अपघात झाला आहे. या बसमध्ये ४७ प्रवासी प्रवास करत होते अशीही माहिती मिळते आहे. मृतांच्या नातेवाईकांना उत्तर प्रदेश रोडवेजने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)