XRBIA आवाक्यातील घरांचे ट्रेंडसेंटर (भाग-१)

आवाक्‍यातील घरांचा ट्रेंड सेट करणारे म्हणून ओळख असलेल्या “एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’ने आता शहराच्या मार्केट यार्ड, बालेवाडीसह मध्यवर्ती व मोक्‍याच्या ठिकाणांवर गृहप्रकल्प सादर केले आहेत. ते प्रकल्पदेखील सुविधासंपन्न आहेत. या प्रकल्पांविषयी “एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राहुल नाहर यांच्याशी केलेली ही बातचीत…

आयटी पार्क केंद्र म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीमध्ये 2006 साली “एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’ने व्हर्जिन हाऊसिंगच्या माध्यमातून आवाक्‍यातील व स्मार्ट घरांच्या उभारणीला सुरुवात केली. प्रत्येक घरात व सोसायटींमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे तेव्हापासून “एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’ म्हणजे सामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारे व्यासपीठ अशीच सार्थ ओळख बनली. हिंजवडी येथे 3 हजार 200 सदनिकांचा गृहप्रकल्प त्यांनी पूर्ण केला असून तो पूर्णपणे हस्तांतरित देखील झाला आहे. त्याशिवाय चाकण येथे एक सातशे घरांचा प्रकल्प पूर्ण झाला असून दोन हजार घरांचा प्रकल्प पूर्णत्वास जातो आहे.

आवाक्‍यातील पण परिपूर्ण घर
आता मध्यम उत्पन्न गटासाठी देखील “एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’ने प्रकल्पांची उभारणी सुरू केली आहे. त्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मार्केट यार्ड परिसरात गंगाधाम चौकानजीक उभा राहात असलेला “एक्‍झर्बिया मार्केट यार्ड’ या गृहप्रकल्पांकडे पाहता येईल. एक्‍झर्बिया डेव्हलपर्सकडून या प्रकल्पात सर्व अत्याधुनिक व स्मार्ट सुविधांच्या माध्यमातून ग्राहकांना आरामदायी जीवनशैली अनुभवता येणार आहे.

-Ads-

XRBIA आवाक्यातील घरांचे ट्रेंडसेंटर (भाग-२)

“एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’मध्ये स्टुडिओ अपार्टमेंट केवळ रुपये 20.81 लाखांमध्ये, वन बीएचके 25.95 लाखांमध्ये तर 2 बीएचके 42.11 लाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

– प्रतिनिधी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)