XRBIA आवाक्यातील घरांचे ट्रेंडसेंटर (भाग-२)

आवाक्‍यातील घरांचा ट्रेंड सेट करणारे म्हणून ओळख असलेल्या “एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’ने आता शहराच्या मार्केट यार्ड, बालेवाडीसह मध्यवर्ती व मोक्‍याच्या ठिकाणांवर गृहप्रकल्प सादर केले आहेत. ते प्रकल्पदेखील सुविधासंपन्न आहेत. या प्रकल्पांविषयी “एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राहुल नाहर यांच्याशी केलेली ही बातचीत…

XRBIA आवाक्यातील घरांचे ट्रेंडसेंटर (भाग-१)

“एक्‍झर्बिया मार्केट यार्ड’ हे निवासासाठी व व्यवसायासाठी एक उत्तम ठिकाण असेल, कारण यात एका परिपूर्ण कुटुंबासाठी अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. गुणवत्तापूर्ण बांधकाम असणाऱ्या या प्रकल्पांत क्‍लब हाऊस, एरोबिक्‍स स्टुडिओ, म्युझिक रूम, जिम, स्पा, जलतरण तलाव, रुफ-टॉप रेस्टॉरंट, मिनी थिएटर, कम्युनिटी किचन, गझिबो, चिमुकल्यांसाठी खेळण्याची जागा, बाग आणि अशा अनेक काळानुरूप सुविधांचा समावेश आहे. यासोबतच या प्रकल्पाचे लोकेशन इतके महत्त्वपूर्ण व मोक्‍याचे आहे की, नामवंत शैक्षणिक संस्था, सार्वजनिक परिवहन सेवेचे स्टेशन, पेट्रोल पंप, रुग्णालये व शॉपिंग मॉल्सची जवळीकता “एक्‍झर्बिया मार्केट यार्ड’ला लाभलेली आहे. “एक्‍झर्बिया मार्केट यार्ड’ हा रेरा नोंदणीकृत असून (रेरा नोंदणी क्र.P 52100017777) यामध्ये पात्र अर्जदारांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणारे 2.67 लाखांचे अनुदान देखील उपलब्ध आहे.

या प्रकल्पास ग्राहकांचा लक्षणीय प्रतिसाद लाभतो आहे. हा प्रतिसाद आणखी वाढेल असा विश्‍वास राहुल नाहर यांनी व्यक्त केला.

ग्राहकांची मागणी आणि बाजारपेठेचा विचार करता अनेक बांधकाम व्यावसायिक आपले प्लॅन्स बदलत छोट्या व आवाक्‍यातील व योग्य किमतीत घरांच्या उभारणीला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र, एक्‍झर्बियाने आवाक्‍यातील घरांच्या उभारणीला आधीपासूनच प्राधान्य दिले. केंद्रशासनाच्या सर्वांसाठी घर या योजनेच्या आधी आवाक्‍यातील घरांच्या उभारणीला सुरुवात करीत सर्वसामान्यांसाठी आवश्‍यक असणाऱ्या घरांचा, त्यांचा स्वप्नांचा विचार केला हेच त्यांचे आगळेपण.

धानोरी आणि बालेवाडीतही : पुण्यात “एक्‍झर्बिया मार्केट यार्ड’प्रमाणेच आगामी काही महिन्यांमध्ये बालेवाडी आणि धानोरी येथे देखील “एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’ तर्फे आवाक्‍यातील गृहप्रकल्प सादर करण्यात येणार आहेत. पुण्यासोबत मुंबईत नेरळ, पनवेल, चेंबूर आदी उपनगरांमध्ये देखील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणारे प्रकल्प सादर करण्यात येणार असल्याचे नाहर यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी –
www.xrbiamarketyard.com

“एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’ने आवाक्‍यातील व स्मार्ट घरांच्या उभारणीला सर्वात आधी सुरुवात केली. त्याअंतर्गत घरातील जागेचा पुरेपूर वापर करून घराचे डिझाईन बनविण्यात आले. केवळ फ्लोअर प्लॅनच नव्हे तर त्या घरांत व सोसायटींमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. जेणेकरून ते घर स्मार्ट घर ठरेल. तेव्हापासून “एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’ म्हणजे सामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारे व्यासपीठ म्हणून ओळख बनली.
– राहुल नाहर (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, “एक्‍झर्बिया डेव्हलपर्स’)

– प्रतिनिधी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)