मॅन्चेस्टरमध्ये वृद्धिमान साहावर झाली शस्त्रक्रिया

मॅन्चेस्टर – भारतीय क्रिकेटर आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याच्या खांद्यावर बुधवारी मॅन्चेस्टर येथे शस्त्रक्रिया झाली. बुधवारी बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. बीसीसीआयने याबदल माहिती देताना सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तसेच वृद्धिमान साहा तू लवकर बरा होशील अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. वृद्धिमान यांचा शस्त्रक्रियेनंतरचा फोटोदेखील पोस्ट केला आहे.

यामुळे भारतीय यष्टीरक्षक साहा याला अफगाणिस्तान विरूध्द झालेल्या कसोटी सामन्यास मुकावे लागले होते. तसेच सध्या इंग्लंड विरूध्द चालू असलेल्या इंग्लंड कसोटी मालिकेपासूनही त्याला दूर रहावे लागले. त्याच्याजागी आता संघामध्ये दिनेश कार्तिक यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)