वरच्या क्रमांकावर खेळण्यास आवडेल – मॅक्‍सवेल

बेंगळुरू: एकदिवसीय सामन्यात वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली तर तेथे खेळायला आवडेल. संघातील आघाडीचे फलंदाज कशी फलंदाजी करत आहेत आणि मी तेथे खेळणे संघहिताचे ठरणार आहे की नाही याचा देखील विचार करायला हवा, असे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी- 20 सामन्यात शतकीय खेळी करत ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय साकारणारा ग्लेन मॅक्‍सवेल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाला.

एकदिवसीय सामन्यात मॅक्‍सवेल ऑस्ट्रेलियासाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजीस येतो. तर टी- 20 सामन्यांत वरच्या क्रमांकावर फलंदाजी करतो. तो म्हणाला, दुसऱ्या टी- 20 सामन्यात मी जेव्हा फलंदाजीस आलो होतो तेव्हा 15 षटकांचा खेळ बाकी होता. त्यामुळे मी मोठी खेळी करणे अपेक्षित होते. जर मी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर खेळण्यास आलो असतो तर मी किती धावा केल्या, याला फारसे महत्त्व नसते. मिळालेल्या संधीचा योग्य तो फायदा घेणे महत्त्वाचे आहे. एकदिवसीय प्रकारात खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येत सामना झुकवणे कठीण काम आहे. त्यामुळे वरच्या क्रमांकावर येत जास्तीत जासत चेंडूचा सामना करत सामन्याचा निकाल संघाच्या बाजुने फिरवणे तुलनेने सोपे आहे. त्यामुळे वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळली तर खेळायला आवडेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या टी- 20 सामन्यातील फलंदाजीबाबत बोलताना तो म्हणाला, या खेळपट्टीवर चेंडू वेगाने येत होता. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजीस प्रतिकूल होती. मी जास्त आक्रमक न होता चेंडूच्या गुणवत्तेनुसार खेळ करण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या चार षटकांत आम्हाला विजयासाठी 44 धावा करायच्या होत्या त्यावेळी बुमराह पुन्हा गोलदाजीस आला. त्याच्या गलंदाजीवर आक्रमक फटके खेळण्याचे मी ठरवल होते. कारण, जर त्याच्या षटकात आम्ही चार – पाच धावा बनविल्या असत्या तर अखेरच्या तीन षटकांत 13 च्या सरासरीने धावा जमवणे शक्‍य झाले नसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)