जगातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी मांजरीचे निधन

7 अब्ज 3 कोटी 48 लाखांची होती मालकीण

न्यूयॉर्क – जगातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ग्रुम्पी नावाच्या सेलिब्रिटी मांजराचे काल निधन झाले.
ग्रुम्पी कॅट आपल्या रागट लुकसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रुम्पी नावाच्या मांजराच्या नावावर तब्बल 100 दशलक्ष डॉलर म्हणजे 7 अब्ज, 3 कोटी, 48 लाख रुपयांची मालमत्ता आहे. ग्रुम्पीचे वयाच्या 7 व्या वर्षी निधन झाले आहे. याबाबतची माहिती तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.

ग्रुम्पी कॅटचे खरे नाव तरदार सॉस असे होते. ग्रुम्पीचा मृत्यू मृत्राचा संसर्ग झाल्याने झाला. ग्रुम्पीची जगातील सर्वात रागीट मांजर अशी ओळख होती. तिचे नाक अतिशय चपटे होते. ती कित्येकदा जगात सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॅगझिनवरही झळकली होती. विशेष म्हणजे ग्रुम्पीवर एक हॉलिवूड चित्रपटही रिलीज झाला होता.

मॉरिसटाऊनचे प्रसिद्ध उद्योजक तबाथा यांची ही मांजर होती. 2012 साली ग्रुम्पीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिच्या चेहऱ्यावरील रागट हावभाव यात दाखवण्यात आले होते. 15.7 मिलियन लोकांनी या व्हिडीओ बघितला होता. त्यानंतर ती एखाद्या हॉलिवूड सेलिब्रिटीप्रमाणे प्रसिद्ध झाली होती. ट्विटरवर तिचे 1.53 मिलियन फॉलोवर्स आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)