प्रेस क्‍लबच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आज कार्यक्रम

नगर – प्रेस क्‍लबच्या वतीने आज रविवार दि. 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी शहरातील वृत्त छायाचित्रकार व माध्यमांच्या कॅमेरामनचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रेस क्‍लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी दिली.

19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो. प्रेस क्‍लबच्या वतीने मागील तीन वर्षापासून प्रिंट मीडियासह इलेक्‍ट्रॉनिक मीडियात कार्यारत असलेल्या वृत्त छायाचित्रकार व माध्यमांच्या कॅमेरामनचा सत्कार केला जातो.

-Ads-

याही वर्षी रविवारी दुपारी 2.30 वाजता हॉटेल उदनराजे पॅलेस, सक्कर चौक, स्टेशन रोड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चित्रलेखा मासिकाचे संपादक ज्ञानेश महाराव यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार सोहळा रंगणार आहे. तरी शहरातील सर्व वृत्त छायाचित्रकार व माध्यमांच्या कॅमेरामन बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस क्‍लबच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)