जागतिक क्रमवारीत ‘संजू’ ६ नंबरवर ; तोडला ‘टाइगर जिंदा है’चा रेकॉर्ड

नवी दिल्ली: रणबीर कपूरचा संजू चित्रपट दिवसेंदिवस कमाईचे नवीन उच्चांक गाठत आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेला ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १ महिना संपला. तरी देखील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कमी होत नसून भारतात ३०० करोडचा आकडा पार केलेल्या संजूने जागतिक पातळीवर देखील आपला झेंडा रोवला आहे.

जागतिक पातळीवर सर्वाधिक कमाई करणारा ‘संजू’ ६वा भारतीय चित्रपट ठरला आहे. संजूने ५७० करोड कमाई करत सलमान खानच्या ‘टाइगर जिंदा है’ या चीत्रपटाचा रेकॉर्ड तोडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रणबीरच्या करिअरमधील हा सर्वांधिक गाजलेला चित्रपट ठरला. कारण त्याने ‘दंगल’, ‘टायगर जिंदा है’ आणि आता ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. इतकंच नव्हे तर ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमसुद्धा ‘संजू’ने मोडला आहे.

जागतिक पातळीवर सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट

१. ‘बाहुबली: द कनक्लूजन’ – ८०२ करोड रुपये
२. ‘दंगल’ – ७०२ करोड रुपये
३. ‘पीके’ – ६१६ करोड रुपये
४. ‘बजरंगी भाईजान’ – ६०४ करोड रुपये
५. ‘सुल्तान’ – ५७७ करोड रुपये
६. ‘संजू’ – ५७० तकरीबन करोड रुपये
७. ‘टाइगर जिंदा है’ – ५६५ करोड रुपये
८. ‘पद्मावत’ – ५४६ करोड रुपये
९. ‘धूम 3’ – ५२४ करोड रुपये
१०. ‘चेन्नई एक्सप्रेस’ – ३९६ करोड रुपये


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)