#CWC19 : अखेर सॅल्यूट दिसले

मँचेस्टर : वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना भारताने एकतर्फी जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 268 धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव 143 धावांत गुंडाळून 125 धावांनी विजय मिळवला.

दरम्यान, विंडीजचा शेल्ड्रॉन कॉट्रेल हा त्यांच्या सेनादलात आहे. विकेट घेतल्यानंतर तो सॅल्यूट ठोकत आनंद व्यक्त करतो. त्याची ही खासियत येथे लोकप्रिय झाली आहे. येथे त्याची ही खासियत अपेक्षित होती. मात्र, त्यासाठी प्रेक्षकांना 49 षटके वाट पाहावी लागली. या षटकात त्याने पांड्या व मोहम्मद शमी यांना बाद करीत सणसणीत सॅल्यूट ठोकले.

Leave A Reply

Your email address will not be published.