विश्‍वचषक हॉकी स्पर्धा 2018: नेदरलॅंडचा पराभव करत बेल्जियम विश्‍वविजेता

भुवनेश्‍वर: येथे होत असलेल्या हॉकी विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेल्जियमच्या संघाने नेदरलॅंडच्या संघाचा 3-2 असा पराभव करताना विश्‍वविजेतेपद पटकावले असून संपुर्ण सामन्यासह पेनल्टी कॉर्नरमध्ये दोन्ही संघ बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल सडन डेथ पद्धतीने करण्यात आला यात बेल्जियमने बाजी मारत स्पर्धेचे विजेतेपद आपल्यानावे केले.

संपुर्ण सामन्यात बेल्जियम आणि नेदरलॅंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ सादर करत गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र दोन्ही संघांना सामन्यत गोल करण्यात अपयश येत होते. त्यातच पहिल्या हाफ मध्ये बेल्जियमच्या आक्रमक खेळा समोर नेदरलॅंडच्या बचावपटूंनी सावध खेळाचे प्रदर्शन करताना बेल्जियमला आपल्या गोल पोस्ट पासून दुर ठेवण्यात यश मिळवले. त्यात पहिल्या हाफच्या 51 % वेळ बेल्जियमने चेंडू आपल्या ताब्यात ठेवला होता. मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आल्याने पहिल्या हाफमध्ये एकही गोल होउ शकला नाही. तर, दुसऱ्या हाफ मध्येही बेल्जियमला गोल करण्यात अपयश आले मात्र त्यांनी आपला आक्रमक खेळ सुरुच ठेवला होता. मात्र, नेदरलॅंडला बेल्जियमच्या गोल पोस्ट वर आक्रमण करण्यात सातत्याने अपयश येत होते. त्यात्च बेल्जियमने एक दोन वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात अपयश आल्याने दुसऱ्या हाफ मध्येही गोल होउ शकला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिसऱ्या हाफ मध्ये दोन्ही संघांनी आक्रमक सुरूवात केली होती. त्यामुळे या हाफमध्ये गोल होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. मात्र पुन्हा दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश येत होते त्यामुळे तिसरा हाफ देखिल गोलवीनाच संपला. यात अनेक गोल करण्याच्या संधी खेळाडूंनी आपल्या चुकींनी घालवल्या. तर, चौथ्या हाफमध्ये देखिल गोल करण्याच्या अनेक संधी दोन्ही संघातील खेळाडूंनी घालवल्यानंतर अतिरीक्त 2 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. त्यातही गोल होउ शकला नाही. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी कॉर्नरवर घेण्याचे ठरविण्यात आले.

पेनल्टी मध्ये नेदरलेंडने पहिला गोल केला तर त्यानंतरच्या संधीवर बेल्जियमला गोल करण्यात अपयश आले. तर, नेदरलॅंडचा दुसरा प्रयत्न बेल्जियमच्या गोल रक्षकाने परतावून लावल्यानंतर बेल्जियमला पुन्हा गोल करण्यात्‌ अपयश आले. यानंतर पुन्हा नेदरलॅंडने गोल करत आपली आघाडी 2-0 अशी वाढवली. यानंतर दोन्ही प्रयत्नात बेल्जियमने दोन गोल लगावले. तर नेदरलॅंडचा एक प्रयत्न वाया गेल्याने निकाल सडन डेथ मध्ये घेण्याचे ठरविण्यात आले. यानंतर सडन डेथ मध्ये पहिल्या संधीवर बेल्जियमने गोल केला. मात्र, नेदरलॅंडला गोल करण्यात अपयश आल्याने सामना बेल्जियमने 3-2 अश्‍या फरकाने जिंकत विश्‍वविजेतेपदावर मोहोर उमटवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)