विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा 100 दिवसांवर ; इंग्लंड आणि भारतीय संघ प्रमुख दावेदार

लंडन: येथे होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धा 2019 च्या स्पर्धेचे आता काऊंट डाऊन सुरू झाले असून सदर स्पर्धा ही 100 दिवसांवर येवून ठेपली आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि भारतीय संघाला विश्‍वचषक विजेतेपदाचे मुख्य दावेदार समजले जात असले तरी दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ कोणत्याही संघाला पराभुत करण्याची क्षमता राखून आहेत.

इंग्लंडचा संघ 1975 पासूनच्या सर्व विश्‍वचषक स्पर्धांमध्ये सामिल झाला होता. यातील एकाही विश्‍वचषकात इंग्लंडच्या संघाला विजेतेपद मिळालेले नाही. त्यामुळे यंदाचा विश्‍वचषक पटकावायच्या हेतूने इंग्लंडचा संघ स्पर्धेत खेळताना दिसून येईल. यावेळी इंग्लंडचा संघ 1979, 1987 आणि 1992 या वर्षांमध्ये झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, त्यावेळी त्यांना विजेतेपद पटकावता आले नाही. तर, गतवेळच्या 2015 सालच्या विश्‍वचषक स्पर्धेत त्यांच्या संघाला साखळी फेरीत बांगलादेशच्या संघाकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते.
तर, भारतीय संघाने देखील सर्व विश्‍वचषक स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. ज्यातील 1983 आणि 2011 सालचा विश्‍वचषक जिंकण्यात भारतीय संघाला यश आलेले असून त्या व्यतिरीक्त भारतीय संघाने तीन वेळा उपान्त्यफेरीत तर एक वेळा अंतिम फेरीत सहभाग नोंदवला आहे. तसेच गतवेळच्या 2015 सालच्या विश्‍वचषक स्पर्धेत भारताला उपान्त्यफेरीत ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गत दोन वेळेस ज्या देशांमध्ये विश्‍वचषक स्पर्धा रंगल्या आहेत त्या देशांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे यंदाच्या विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार म्हणुन इंग्लंडच्या संघाकडे पाहिले जात आहे. मात्र, त्यांचा संघ दबावाखाली चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो असा अनुभव आता पर्यंतच्या विश्‍वचषकातील त्यांच्या कामगिरीतून सर्वांसमोर आलेला आहे.

या विश्‍वचषक स्पर्धेच्या दृष्टीने इंग्लंडच्या संघाने जोरदार तयारी केली आहे. त्यांनी त्यासाठी माजी कर्णधार अँड्रयू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली संघात भरपुर बदल केले. ज्याची सुरूवात त्यांनी त्यांचे प्रशिक्षक बदलण्यातून करत आपले पहिले प्रशिक्षक पिटर मूरयांना हटवून त्यांच्या जागी ऑस्ट्रेलियन खेळाडू ट्रेवर बेलिसयांना संघाचे प्रशिक्षकपद सोपवले. बेलिसयांच्या आगमनानंतर इंग्लंडच्या संघाची मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात कामगिरी चांगलीच सुधारली असून त्यांनी त्यानंतर दोन वेळा सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. ज्यात ट्रेंट ब्रीजच्या मैदानावर त्यांनी पहिल्यांदा पाकिस्तान विरोधात 3 बाद 444 तर, त्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या संघा विरुद्ध 6 बाद 481 धावांचा डोंगर उभारला होता.

तसेच सध्या इंग्लंडच्या संघामध्ये कर्णधार इऑन मॉर्गन, जो रुट, जेसन रॉय, ऍलेक्‍स हेल्स आणि जोस बटलर सारखे तडाखेबाज फलंदाज आहेत. ज्यामुळे त्यांना कोणत्याही आव्हानाचा पाठलाग करणे सोपे जाते.

तर, दुसरीकडे भारतीय संघ असून सध्या भारतीय संघाकडे संभाव्य विजेतेपद पटकावू शकणारा संघ म्हणुन पाहिले जात आहे. भारतीय संघाने विश्‍वचषकाच्या दृष्टीने फार पुर्वी पासूनच तयारीला सुरूवात केली असली तरी सध्या भारतीय संघ मधल्याफळीतील फलंदाजांचे अपयश आणि त्याफळीतील सुयोग्य खेळाडूंचा शोध घेण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यामुळे भारतीय संघाने 18 खेळाडूंची निवड केली असली तरी अद्याप हे खेळाडू कोण असतील याचा मात्र उलगडा केलेला नाही.

तरी सध्या भारतीय संघातील आघाडीच्या फळीतील फलंदाज सध्या चांगल्या लयीत असून ते प्रत्येक सामन्यात संघाला चांगली सुरूवात करुण देण्यात यशस्वी ठरत आहेत. तर, मधल्याफळीतील मुख्य अधारस्तंभ असलेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील सध्या फॉर्मात परतल्याने भारतीय संघाची चिंता कमी झाली आहे. त्याच बरोबर सध्याचा भारतीय संघाची गोलंदाजी ही सर्वोत्तम गोलंदाजी असल्याचे बोलले जात असल्याने भारतीय संघाला विश्‍वचषक तिसऱ्यांदा पटकाविण्याची संधी असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)