नवी दिल्ली – विश्वचषक 2019 साठी काउंडडाउन सुरू झाले आहे. विश्वचषक सुरू होण्यासाठी काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. अशामध्ये भारतीय संघातील महेंद्र सिंग धोनी याच्या भूमिकेबदल चांगलीच चर्चा होत आहे. विश्वचषक 2019 मध्ये भारतीय संघात ऋषम पंतला खेळवावे की धोनीला संघात कायम ठेवावं, यावर वीरेंद्र सेहवाग आपले मत व्यक्त केले आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि फलंदाज सेहवागने विश्वचषक 2019 मध्ये विश्वचषकात भारतीय संघात महेंद्र धोनी असावा याचं समर्थन केलं आहे. सेहवागचे म्हणणं आहे की, ‘विश्वचषक 2019 मध्ये महेंद्र सिंग धोनीचे भारतीय संघात असणं महत्वाचं आहे. सेहवागने म्हटले आहे की, ‘माझ्या स्वत:च्या मते एम.एस.धोनी हा 2019 विश्वचषकात  भारतीय संघात असावा’.

पुढे बोलताना सेहवाग म्हटला की, ‘जर तुम्ही 2019 पर्यंत ऋषभ पंतला आत्तापासूनच भारतीय संघात खेळवण्यास संधी दिली तर विश्वचषकापर्यंत पंत 15-16 सामनेच खेळू शकेल.हा अनुभव धोनीच्या तुलनेत खूपच कमी असेल. धोनीने 300 पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळले आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की धोनीनेच विश्वचषकात खेळावे’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)