जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा भारतावर निसटता विजय

चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा
ब्रेडा: सलग दोन विजयांसह चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेमध्ये दमदार वाटचाल करणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताचा संघ गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

अंतिम फेरीत प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी भारताला बेल्जियमविरुद्धच्या सामन्यातील विजय अनिवार्य आहे. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघाचा बचाव भेदण्याचं काम भारतीय खेळाडूंना जमले नाही. आक्रमक सुरुवात केलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्राच्या सहाव्या मिनिटाला गोल करुन आपल्या संघाचे खाते उघडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताला पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधण्याची चांगली संधी आली होती. मात्र मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करणे भारतीय ड्रॅगफ्लिकर्सना जमले नाही. मात्र वरुण कुमारने 11 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन भारताला सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पाठोपाठ पहिल्या सत्राच्या अखेरीस ग्रेगने गोल करून ऑस्ट्रेलियाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या मिटनने गोल करत संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला थोडा अवधी शिल्लक असताना हरमनप्रीत सिंहने 58 व्या मिनिटाला गोल करुन भारताची पिछाडी 2-3 अशी कमी केली. मात्र उरलेल्या एका मिनिटात बरोबरी साधण्याचा भारताचा प्रयत्न फोल ठरला व त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)